Sat, Feb 29, 2020 18:48होमपेज › Belgaon › यंदाच्या निवडणुकीत १६ लाख व्हीव्हीपॅटचा होणार वापर 

यंदाच्या निवडणुकीत १६ लाख व्हीव्हीपॅटचा होणार वापर 

Published On: Apr 06 2019 1:44AM | Last Updated: Apr 05 2019 11:35PM
बेळगाव : प्रतिनिधी

व्हीव्हीपॅटची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हार्डवेअर वापरावे लागते. सन 1899 मध्ये अमेरिकेत जोसेफ ग्रे यांनी यांत्रिक पद्धतीने मतदान होताना कागदावर त्याची माहिती प्रसिद्ध होईल अशा स्वरुपाच्या व्यवस्थेचे प्रारूप तयार केले होते. जवळपास शतकभरानंतर रेबेका मर्क्युरी यांनी याला मूर्त स्वरुपात आणले.

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर निवडणूक आयोग 16 लाख  मशीन लोकसभा निवडणुकीत वापरणार आहे.  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत  त्याचा वापर होणार आहे. निवडणूक आयोगाने  2013 मध्ये या मशीन्सच्या वापराला मान्यता दिली. केंद्र सरकारने यासाठी 3, 174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतांची फेरफार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी यापूर्वी केला आहे.

उमेदवाराकडून ‘पराभव दिसू लागला की तक्रार होते’ या संदर्भात काहीही तक्रार किंवा गडबड असेल तर निवडणूक आयोग स्पष्टीकरण देते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानावर उमेदवार आक्षेप घेत असेल तर फेरमतदान मोजणी करताना व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग होतो. कारण व्हीव्हीपॅटमशीनमध्ये मतदान झाल्यानंतर मतदाराला कुणाला मतदान झाले आहे त्याचे चित्र पाहण्याची संधी मिळते. त्याप्रमाणे मतदान झाल्यानंतर कुणाला मतदान झाले आहे त्याची पावती व्हीव्हीपॅट मशीनमध्ये आतल्या बाजूने पडण्याची सोय आहे. या पावतीवरुन फेरमतमोजणी करता येते.