Fri, Sep 25, 2020 15:41होमपेज › Belgaon › ११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच

११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 16 2017 1:40AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

राज्यामध्ये रेशनकार्डासाठी 15 लाख अर्ज आले होते. पैकी 11 लाख मंजूर करून नागरिकांना कार्डे पोस्टाने घरपोच देण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री यू. टी. खादर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

छाननीनंतर एक लाख अर्ज रद्द केले. उर्वरित कार्डेही प्रिंट करण्याचे काम सुरू असून ती लवकरच अर्जदारांच्या घरी पाठवली जातील. बेळगाव जिल्ह्यामध्ये 1 लाख 90 हजार अर्ज आले होते. पैकी 20 हजार कार्डे पाठवली. 1 लाख 30 हजार कार्डांचे प्रिटींगही केले जात असून ती कार्डेही लवकरच पाठवणार आहे. उर्वरित अर्जांची छाननी करून निर्णय घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले.

रेशन दुकानदारांना पाईंट ऑफ सेल मशीन देण्यात आले असून देशात प्रथमच ही पध्दत कर्नाटकात अमलात आणली आहे. रेशन कार्डासाठी केवळ आधारकार्ड पुरेसे आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे  2 टक्के तांदूळ व गहू मुदतीत उचलला जात नाही. यामुळे तो खराब कोटा निकालात काढण्याचा आदेश दिलला आहे. उत्तर कर्नाटकामध्ये प्रति कार्डावर पाच किलो तांदूळ व दोन किलो गहू तर दक्षिण कर्नाटकामध्ये सात किलो तांदूळ व दोन किलो गहू देण्याचा आदेश बजावला आहे. 

हॉटेलवरील जीएसटीमध्येही कपात केली आहे. पण दर कमी केलेले नाहीत, अशी तक्रार पत्रकारांनी केली. खादर क्षहणाले, त्या प्रकरणी खात्याच्या अधिकार्‍यांना तपासणीचा आदेश बजावून कारवाई करण्यास सांगितले आहे. अनेक श्रीमंतांकडेही बीपीएल कार्डे असल्याचे पत्रकारानी निदर्शनास आणले. ते म्हणाले, वार्षिक 1 लाख 20 हजार उत्पन्न असलेल्याना बीपीएल कार्ड देण्यात येते. श्रीमंतांनी ते कार्ड घेतले असेल तर त्यांच्यावर  कारवाई होऊ शकते. खादर यांनी खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, खात्याच्या उपसंचालिका सईदा आफ्रीदीबानु, बळ्ळारी  व अधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधी सक्षम म्हणून....

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाली. पत्रकारांनी त्या पदावर गांधी घराण्याची वंशपरंपरा चालते का, असा प्रश्‍न विचारता खादर म्हणाले, गांधी, नेहरू यांच्याशिवाय अध्यक्षपदावर अन्य व्यक्तींनीही काम  केले आहे. राहुल काँग्रेसचे व देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत.