Thu, Sep 24, 2020 07:01होमपेज › Belgaon › गँगरेप प्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास 

गँगरेप प्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास 

Published On: Nov 04 2018 1:16AM | Last Updated: Nov 03 2018 10:21PMबेळगाव ः प्रतिनिधी

अल्पवयीन  मुलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या तिघा आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत 10 वर्षांच्या कठीण कारावासाची शिक्षा   येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने सुनावली. सत्याप्पा भीमाप्पा डांगी, यमनूर सहदेव राजापूर, सुरेश शिवाप्पा डांगे (तिघेही रा. इटनाळ ता. रायबाग) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रायबाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

इटनाळ येथे आरोपी सत्याप्पा भीमाप्पा डांगे याचे किराणा दुकान असून दुकानाला आलेल्या सदर अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी मोबाईलवर संभाषण केले होते. सदर अल्पवयीन मुलीचे त्यांच्याच नातलगातील एकाशी  लग्न लावून देण्याची बोलणी झाली होती. सदर विषय सत्याप्पा डांगी याला समजल्याने त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. अन्यथा फोनवरील संभाषण सगळ्यांना सांगून बदनामी करू अशी धमकी दिली होती. दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी  सायकलीवरून शाळेला जात असताना सदर मुलीला बोलायचे कारण सांगून तिघा आरोपींनी थांबून घेतले होते. यानंतर तिला तिघांनीही उचलून घेऊन जाऊन रस्त्याकडील उसाच्या फडात सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर सदर विषय कोणालाही सांगेल या भीतीने तिघा आरोपींनी तिला शेतवडीतील एका विहिरीत फेकून दिले होते. मात्र सदर मुलीने विहिरीतील दोरी धरून कसेबसे थांबली होती. आरोपी त्याठिकाणाहून गेल्यानंतर विहिरीतून ओरडल्याने सदर हाक ऐकून काहीजणांनी विहिरीतून बाहेर काढले होते. तिच्यावर रायबाग इस्पितळात उपचार करण्यात आले होते. यानंतर रायबाग पोलिस स्थानकात गँगरेप व खुनाची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीवरून सदर प्रकरणाची तिसर्‍या अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायालयात दोषरोप दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जे. नंजुडय्या यांनी याप्रकरणातील 24 साक्षी, 48 कागदपत्रे आणि 26 मुद्देमाल पुरावे म्हणून पाहणी करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने तिघाही आरोपींना 10 वर्षाच्या कठीण कारावसाची शिक्षा आणि 54 हजार रु. दंड सुनावला आहेे सरकारतर्फे अ‍ॅड. एल.व्ही.पाटील यांनी कामकाज पाहिले.