Thu, Sep 24, 2020 08:10होमपेज › Belgaon › मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ४९२ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ (video)

मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ४९२ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ (video) 

Published On: Sep 19 2019 1:51PM | Last Updated: Sep 20 2019 9:56AM

मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये ४९२ जवानांनी घेतली शपथबेळगाव : प्रतिनिधी

मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये आज गुरूवारी ४९२ जवानांनी देश सेवा करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू उपस्थित होते. तसेच यावेळी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

या कार्यक्रमात पीजेएस पन्नू यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे की, मुष्कील वक्त मराठा सक्त. आज मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये देशसेवा करण्यासाठी ४९२ जवानांनी शपथविधी घेतली आहे. भविष्यात या जवानांनी आपल्या मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये चांगली कामगिरी करून बढती मिळवावी. तसेच सेवा बजावताना वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे बळ देवो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.