Mon, Jul 13, 2020 07:05होमपेज › Aurangabad › मोबाईलवर गेम खेळल्यानंतर तरुणाची आत्महत्या

मोबाईलवर गेम खेळल्यानंतर तरुणाची आत्महत्या

Published On: Mar 02 2019 12:55AM | Last Updated: Mar 02 2019 12:55AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

अठरा वर्षीय तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील किलेअर्क भागात शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. सय्यद फैझान सय्यद एजाज (वय-18) असे मृताचे नाव आहे. 

फैझान हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री खोलीत झोपण्यासाठी गेला. मोबाईलवर काही वेळ गेम खेळल्यानंतर त्याने गळफास घेतला. दरम्यान, ही बाब त्याच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.