Sat, Dec 07, 2019 10:17होमपेज › Aurangabad › कामगारांचा विभागीय आयुक्‍तालयावर मोर्चा

कामगारांचा विभागीय आयुक्‍तालयावर मोर्चा

Published On: Jan 08 2019 3:25PM | Last Updated: Jan 08 2019 3:25PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

कामगार संघटनांनी मंगळवारपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात शहर आणि जिल्ह्यातील कॉम्रेड सिटूसह कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. जवळपास दहा कामगार संघटनांनी क्रांती चौक येथून विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढला. 

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर आला. मोर्चेकऱ्यांनी आयुक्तालयासमोर ठिय्या दिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. दिल्ली गेट ते जळगाव रोड या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास बंद झाली होती.