Mon, Jul 06, 2020 16:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : नगरसेवकाने धमकावल्‍याने महिलेचा मृत्यू

औरंगाबाद : नगरसेवकाच्या धमकीने महिलेचा मृत्यू

Published On: May 25 2018 12:41PM | Last Updated: May 25 2018 12:41PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नगरसेवकाने धमकावल्‍यामुळे एका महिलेचा मृत्‍यू झाल्‍याची घटना समोर आली आहे. शारदाबाई अभिमन्यू भालेराव (वय, ५५ रा. अशोक नगर, नारेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे तर, राजू शिंदे असे धमकी दिलेल्‍या संशयीत नगरसेवकाचे नाव आहे. दरम्‍यान, शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत प्रेत ताब्यात न घेण्याचा निर्णय भालेराव यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. 

नागरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते १९ मे रोजी गॅस वाटपाचा कार्यक्रम घेत होते. त्यावेळी ते तेराशे ते दीढ हजार रुपये घेत असल्याची तक्रार भालेराव यांच्यासह त्यांच्या मुलींनी केली होती. त्यामुळेच नगरसेवकासह त्याच्या कार्यकर्त्यांनी शारदाबाई यांनाधमकी दिली. त्यामुळे ब्रेन हम्बरेज होऊन त्यांचा मृत्यू झाला, असा शारदाबाई यांचया नातेवाईकांचा आरोप केला आहे. 

Tags : aurangabad, woman, corporator