Mon, Aug 03, 2020 15:07होमपेज › Aurangabad › विहिरीत पडलेल्या काळवीटला जीवदान

विहिरीत पडलेल्या काळवीटला जीवदान

Published On: Jun 15 2019 1:44AM | Last Updated: Jun 14 2019 7:59PM
बनकिन्होळा(जि. औरंगाबाद) :  प्रतिनिधी 

पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या काळवीटला नागरिकांनी पसंगावधान दाखवून पाण्यातून बाहेर काढल्‍याने जीवदान मिळाले. सिल्लोड तालुक्यातील वरखेडी येथील शेत शिवारातील गट नंबर ५४  मधील रावसाहेब काशीराम फलके यांच्या विहिरीत हे काळवीट पडले होते. 

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हे काळवीट पाण्याच्या शोधात भटकत असताना विहिरीत पडले. शेत मालक रावसाहेब फलके यांच्या ही गोष्‍ट लक्षात येताच त्‍यांनी आसपाच्या नागरिकांना फोन कारूण याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत पडलेल्या काळवीटाला बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु काळवीट मोठे असल्यामुळे त्‍याला बाहेर काढता आला नाही.  अथक प्रयत्‍नानंतर काही नागरिकांनी  विहिरीत तरूण त्यांनी काळवीटाला चरटाच्यासाह्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सिल्लोड पशुवैद्यकीय दवाखाण्याचे अधिकारी डॉ. गणेश देशमुख यांनी जखमी झालेल्या काळवीटावर उपचार केले. उपचारानंतर काळवीटाला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. 

भागीनाथ फलके, भागवान फलके, कैलास फलके, संतोष फरकाडे, सचिन जाधव, साईनाथ फलके, सोनल जैस्वाल, लक्ष्मण फरकाडे, सुखदेव भगत, बाबासाहेब फरकाडे, गजानन फलके, सखाहारी फलके, गजानन फरकाडे, भारत फलके, नामदेव फलके, संतोष फलके, योगेश फलके, प्रकाश फरकाडे, यांच्यासह इतर ग्रामस्थांनी काटवीटास विहिरीतून बाहेर काढण्यास मद्दत केली.