Sat, Dec 07, 2019 19:50होमपेज › Aurangabad › कन्नड : तलावात बुड़ून दोन तरुणांचा मृत्यू 

कन्नड : तलावात बुड़ून दोन तरुणांचा मृत्यू 

Published On: Sep 21 2019 11:05AM | Last Updated: Sep 21 2019 11:05AM
कन्नड : प्रतिनिधी 

कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथील शुभम सुभाष वाहुल (वय १८) व अक्षय महिंद्र त्रिभुवन (वय १६) या दोन तरुणांचा तलावाच्या पाण्यात बुड़ुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

हे तरुण काल, शुक्रवारी दुपारी गावाकडील डोंगराकडे असलेल्या रोडग्याचा तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुड़ून मृत्यू झाला. आज, शनिवार सकाळी ते पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांना पाण्याबाहेर काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यामुळे बनशेंद्रा गावावर शोककळा पसरली आहे.