Sun, Jul 05, 2020 06:51होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चोरीचा प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद

औरंगाबाद : चोरीचा प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Published On: Aug 21 2018 1:05PM | Last Updated: Aug 21 2018 1:05PMलासुर स्टेशन : पुढारी ऑनलाईन

गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे एक दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करणारे दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरट्यांनी सावंगी चौकात असलेल्या किराणा मालाच्या दुकाना चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी दुकानातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंदही केले. मात्र, जास्त कॅमेरे असल्याने काही कॅमेऱ्यात ते कैद झाले. ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली.

सावंगी चौक ते रेल्वे गेट दरम्यान एका किराणा दुकानात काल रात्री चोरी झाली.  सोमवार (दि. २०) रोजी रात्री आठच्या सुमारात दुकान बंद केले होते. त्यानंतर मध्यरात्री दोन चोरटे बाहेरच्या बाजूने दुकानाचे शटर उचकटून दुकानाच्या आत शिरले. आत शिरताच या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे मोर्चा वळवत कॅमेरे तोडून बंद केले. नंतर दुकानाची झडती घेण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर ते निघून गेले. त्यांचा हा कारनामा सीसीटीव्हीत टिपला गेला आहे. या चोरीमध्ये किती मुद्देमाल व सामान चोरी गेले हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत चौकशी करून फिर्याद देण्याचे बाकी असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरील घटनेची माहिती घेत व सीसीटीव्ही फुटेज तपासले. संबधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्याच्या सूचना केल्या.