Mon, Dec 16, 2019 08:03होमपेज › Aurangabad › पोळ्याच्या दिवशीच झाला बैलांचा दुर्देवी मृत्यू

पोळ्याच्या दिवशीच बैलांचा दुर्देवी मृत्यू

Published On: Aug 30 2019 7:06PM | Last Updated: Aug 30 2019 7:16PM
सिल्लोड : प्रतिनिधी

सिल्‍लोड तालक्‍यातील पिंपळगाव पेठ येथील संतू रानुबा भागवत पोळ्यासाठी आपल्‍या बैलांची जोडी सजवत होते. यावेळी अचानक बैलांना विजेचा धक्‍का बसला. यावेळी दोन्ही बैल जमिनीवर कोसळले आणि त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. ऐन पोळ्याच्या सणादिवशीच बैल जोडींचा मृत्‍यू झाल्‍याने या शेतकरी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला.

या बाबत अधिक माहिती अशी, पिंपळगाव पेठ येथील शेतकरी संतु राणुबा भागवत यांच्या मालकीचे दोन बैल होते. त्यांची किंमत पंचाहत्‍तर हजार रुपये आहे. बैल पोळ्‍याच्या सणा दिवशी शनिवारी सकाळी त्यांनी या बैलांना धुतले व सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बैल सजवत असताना अचानक बैलांच्या अंगाचा थरकाप सूटु लागला व बैल जमिनीवर कोसळले. लगेच पाच मिनिटांत दुसरा बैल सुध्दा अशाच प्रकारे जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक त्या ठिकाणी आले; मात्र, तो पर्यंत हे दोन्ही बैल दगावले होते.

घटनास्थळी तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी बैलांचा पंचनामा करून घेतला गावातील देविदास सांगळे, अन्ना बदर, सकाराम भागवत, मिर्झा नय्युमबेग, दत्तात्रय भोसले, डिगांबर भोसले, शिवराम भोसले, सर्जेराव भागवत आदींसह गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते. 

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, भागवत यांच्या कुटुंबावर पोळ्याच्या दिवशी असा आघात झाल्याने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .