Sat, Jul 04, 2020 08:00होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: कोरोनाचे आणखी तीन बळी; मृतांचा आकडा ८२ वर

औरंगाबाद: कोरोनाचे आणखी तीन बळी; मृतांचा आकडा ८२ वर

Last Updated: Jun 02 2020 12:57PM
औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज आणखी तीन कोरोनाबाधीत रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधीत मृतांची संख्या ८२ वर पोहचली आहे. शहरात सोमवारपर्यंत एकूण मृत्यूचा आकडा ७९ वर गेला होता, तर मंगळवारी पहाटे घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 

पिसादेवी परिसरातील गौतमनगर येथील ६९ वर्षीय महिलेस २९ मे रोजी जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने ३१ मे रोजी रात्री तिला घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. घाटीत उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. तर शहागंज येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णावर २७ मे पासून घाटी मध्ये उपचार सुरू होते मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

कैलास नगर येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ मे रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. २९ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.आतापर्यंत घाटीत ६६, खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये १असे एकूण ८२ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.