होमपेज › Aurangabad › पुढारीच्या दणक्‍याने तिला मिळाले प्रवेश पत्र

पुढारीच्या दणक्‍याने तिला मिळाले प्रवेश पत्र

Published On: Apr 10 2019 3:03PM | Last Updated: Apr 10 2019 3:03PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला विकास निधीच्या नावाखाली संस्थेकडून पैसे मागण्यात आले होते. मात्र तिच्या पालकांनी नकार दिल्याने तिला हॉल तिकीट  देण्यास शिक्षण संस्थेने नकार दिला होता. याबद्दल दैनिक पुढारीने पाठपुरावा केला असता, त्या मुलीला संस्थेकडून निधी माफ करण्यात आला आणि परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यात आले. यामुळे मुलीच्या पालकांनी पुढारीचे आभार मानले. ढोरकीन (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे  हा प्रकार घडला. 

दैनिक पुढारीच्या पाठपुराव्यामुळे मुलीला परिक्षा मिळाल्‍याने तसेच तिला परीक्षा देता येणार असल्‍याने मुलीच्या पालकांनी आभार मानले. यावेळी मुलीच्या पालकांकडून पुढारीचे काकडे , शिंदे , विसपुते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनीच्या पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि दैनिक पुढारीबद्दल मनात असलेला विश्वास पाहून यावेळी दिसून आला.