Mon, Aug 10, 2020 04:02होमपेज › Aurangabad › चोरट्यांनी बिअर-बार फोडून लाखांचा मुद्देमाल लांबवला

चोरट्यांनी बिअर-बार फोडून लाखांचा मुद्देमाल लांबवला

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 1:11AM

बुकमार्क करा
वैजापूर : प्रतिनिधी

शहरातील उक्कडगाव रस्त्यावरील चोरट्यांनी परमिट बारचे शटर तोडून रोख रकमेसह दारू व बिअरच्या बाटल्या अशा एकूण 1 लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 29 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील उक्कडगाव रस्त्यावर शंभू परमिट बिअरबार असून 29 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हॉटेल मालकाने बार बंद करून ते घरी गेले. 30 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मालकास एका अनोळखी इसमाने त्यांना भ्रमणध्वनीवर हॉटेल फोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार हॉटेल मालकाने या घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह देशी, विदेशी कंपनीची  दारू व बिअरच्या बाटल्या असा एकूण एक लाख 13 हजार 376 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी हॉटेलमालक कैलास लांडे 36 रा.वैजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहरातील काही अंतरावर असलेल्या बिअरबार फोडून चोरट्यांनी स्थानिक पोलिसांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असतानाही चोरट्यांनी डल्ला मारून हात साफ केला. त्यामुळे पोलिस रात्रीची गस्त किती डोळ्यात तेल घालून करतात. याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.