Thu, Jul 09, 2020 23:11होमपेज › Aurangabad › औरंगाबादमधील संस्थान गणपतीची दानपेटी लंपास

औरंगाबादमधील संस्थान गणपतीची दानपेटी लंपास

Published On: Dec 23 2018 12:07PM | Last Updated: Dec 23 2018 12:07PM
औरंगाबाद: प्रतिनिधी

शहराचे ग्रामदैवत राजबाजार मधील संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्याने शनिवारी रात्री लंपास केली. रविवारी सकाळी ही घटना उघड झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मे महिन्यात याच भागात दंगल उसळली होती. तेव्हापासून या परिसरातील प्रत्येक घटनेला विशेष महत्व आहे. सकाळीदेखील तणाव निर्माण झाला होता. सिटी चौक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात असून पंचनामा सुरू आहे. दानपेटीत किती रक्कम होती, हे अजून स्पष्ट झाले नाही.