Wed, Jul 08, 2020 17:35होमपेज › Aurangabad › शेतकऱ्यांसाठी नवा पक्ष काढणार : रघुनाथ दादा

शेतकऱ्यांसाठी नवा पक्ष काढणार : रघुनाथ दादा

Published On: Dec 15 2017 2:47PM | Last Updated: Dec 15 2017 2:47PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : पुढारी ऑनालईन 

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांचे प्रश्न संसंदेत विधान भवनात मांडण्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी नवा पक्ष काढणार आहे. अशी घोषणा आज रघुनाथ दादा पाटील यांनी औरंगाबाद येथे केली. 

रघुनाथ दादा पाटील यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘शेतकऱ्यांना एक नावा पर्याय देण्यासाठी मी नवा पक्ष काढणार असून येती लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक लढवणार आहे.’ असे वक्तव्य केले आहे.

रघुनाथ दादांनी या वेळी राहुल गांधींना भाजपच मोठे करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले ‘राहुल गांधीना मोठे करण्याचे काम भाजप करत आहे, भाजपला विरोधी पक्ष म्हणुन काँग्रेस समोर हवी आहे. ज्या राज्यात काँग्रेस नाही तिथे भाजप वाढली नाही.’

स्वभिमानी शेतकरी संघटनेत फुट पडल्यानंतर राजु शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या दोन संघटना झाल्या आहेत. त्या दोनही संघटना निवडणुक लढवणार आहेत. आता रघुनाथ दादांनी तिसऱ्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे तीन पक्षांचे पर्याय असणार आहेत.