होमपेज › Aurangabad › भालगाव फाटा येथे छापा; दोन तलवारींसह कत्ती जप्त

भालगाव फाटा येथे छापा; दोन तलवारींसह कत्ती जप्त

Published On: Mar 26 2019 1:51AM | Last Updated: Mar 26 2019 1:34AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

बीड रोडवरील भालगाव फाटा येथे छापा मारून चिकलठाणा पोलिसांनी दोन तलवारींसह कत्ती जप्त केली. यावेळी एकाला अटक करण्यात आली. 24 मार्चच्या रात्री लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गस्तीवर असताना पथकाने ही कारवाई केली. 

सचिन सुदाम सरोदे (32, रा. गारखेडा क्र. 1) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून शहर व ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येत असून, वाहनांची तपासणी केली जात आहे. 24 मार्चच्या रात्री सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह सहायक फौजदार नारायण कटकुरी, हवालदार थोटे, राठोड, घुगे यांचे पथक गस्तीवर होते. त्यांना आरोपी सचिन सरोदे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने रात्री साडेअकरा वाजता भालगाव फाटा येथे छापा मारला. तेथून तीन फूट व दोन फूट लांबीच्या दोन तलवारी, दीड फूट लांबीची कत्ती हस्तगत केली. तसेच, सचिन सरोदे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सहायक फौजदार नारायण कटकुरी यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.