Wed, Feb 19, 2020 01:44होमपेज › Aurangabad › फक्त झेंड्यामध्ये बदल, भूमिकेत नाही : राज ठाकरे

फक्त झेंड्यामध्ये बदल, भूमिकेत नाही : राज ठाकरे

Last Updated: Feb 16 2020 1:45AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मला हिंदू जननायक म्हणू नका. फक्त मनसेच्या झेंड्यामध्ये बदल झाला आहे, भूमिका बदलली नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

वाचा : लोक काहींना ऐकायला येतात...शरद पवारांचा राज ठाकरेंवर ‘निशाणा’

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
शरद पवारांशी माझे चांगले संबंध आहेत. हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, असे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबदचे नाव बदललं तर काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला.

भीमा कोरगाव तपासाबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास होण्याशी कारण आहे. तो कुणाकडं आहे याला काही महत्व नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

वाचा : भीमा कोरेगाव तपासावरून शरद पवारांची नाराजी; म्हणाले...

 

गोरेगावच्या  नेस्को मैदानावर २३ जानेवारी रोजी मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन झाले. यावेळी मनसेने संपूर्ण भगवा ध्वज फडकवला. त्यासोबतच प्रेरणास्त्रोत म्हणून शिवरायांची राजमुद्रा असलेला आणखी एक भगवा ध्वजही मनसेने फडकवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला.