Mon, Aug 03, 2020 15:36होमपेज › Aurangabad › पुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला

Published On: Jul 22 2019 5:29PM | Last Updated: Jul 22 2019 5:31PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

भारंबा तांडा येथे पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना शनिवारी (दि.२०) घडली होती. यातील वनरक्षक राहुल दामोदर जाधव यांचा मृतदेह हाती लागला होता. तर,अजय संतोष भोई बेपत्ता होते. आज, सोमवारी अजय भोई याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. 

वाचा :पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले

तालुक्यातील पिशोर परिसरात काल, शनिवारी (दि.२०) रोजी मुसळधार पावसाने अंजना नदी सह सर्वच नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पुराच्या पाण्यात वनविभागाचे दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले होते. काल, रविवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. यानंतर राज्य आपत्ती निवारण पथ तसेच वन विभाग आणि पोलिस पथकाने शोध मोहिम सुरु केली होती. यात वनरक्षक राहुल दामोदर जाधव यांचा मृतदेह हाती लागला होता. तर अजय संतोष भोई (रा. शिरपुर जि. नंदुरबार) हे अद्याप बेपत्ता होते. आज,सोमवारी शोध पथकाला भोई यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.