Mon, Jul 06, 2020 17:20होमपेज › Aurangabad › शिऊर येथे घरात "नागपंचमी" , गावात "पत्तेपंचमी" 

शिऊर येथे घरात "नागपंचमी" , गावात "पत्तेपंचमी" 

Published On: Aug 15 2018 4:29PM | Last Updated: Aug 15 2018 4:29PMशिऊर  : सौरभ लाखे 

एकीकडे नागपंचमी आहे म्हणून नागदेवतेसह शंकराची आराधना करणाऱ्या महिला तर दुसरीकडे याच दिवसाच्या   मुहूर्तावर बिनदिक्कत जुगार, पत्ते खेळनारे त्यांचे पतीदेव हे चित्र नागपंचमीला ग्रामीण भागात दिसून आले , शिऊर येथे तर जुगाऱ्यांचा अक्षरक्ष: पोळा भरला होता तर या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप आले होते , पत्त्यांचा डावातुन बुधवारी शिऊर येथे लाखो रुपयांची उलाढाल झाली.

 ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याचे लोण अनेक भागात पसरले आहे.  सणासुदीच्या दिवसाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, परंतु शिऊरसह  अनेक   गावात नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याची एक वेगळीच प्रथा असल्याने यामध्ये तरुण पिढी त्यांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे, या गैर प्रकाराला आळा बसला पाहिजे अशी मागणी महिला वर्गाने व्यक्त केली. 

जुगाऱ्यांना  पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला बहुतांश गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात, शिऊर येथे तर या डावाला जत्रेचे स्वरुप येते, यात एक्का बादशाह, रम्मी, तिरर्ट, असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून जुगार खेळला जातो. दिवस उगवल्यापासून कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होतात.  या पत्तेपंचमीच्या खेळात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो यात कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतो. 

नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते . या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा आहे , यात तरुणासह वृद्धांचाही समावेश असतो मात्र या परंपरेला वेगळे वळण लागत आहे , श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदीयाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या सणाला अन्यन्यसाधारण महत्व आहे तरी काही कुप्रथाही अनेक वर्षांपासून रूढ झाल्या आहे . आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला 'गटारी' म्हणून साजरी केल्यानंतर गावागावातील जुगाऱ्यांना नागपंचमीचे वेध लागतात.  नागपंचमीच्या दिवशी 'पत्ते पंचमी' साजरी करत लाखो रुपयांची उलाढाल करतात. 

पोलीस आले ....पळा... पळा 

शिऊर येथे बुधवारी दुपारी पत्त्यांचे डाव रंगात आले असतांना पोलीस आल्याची एकच अफवा झाल्याने जुगाऱ्यांची धांदल उडाली. पोलीस आले ..पळा.. पळा असे म्हणत सुरक्षित जागा गाठल्या.