Sat, Jul 04, 2020 04:02होमपेज › Aurangabad › प्रकाश आंबेडकरांनी दगा दिला : न्या. कोळसे पाटील

प्रकाश आंबेडकरांनी दगा दिला : न्या. कोळसे पाटील

Published On: Mar 17 2019 7:02PM | Last Updated: Mar 17 2019 7:02PM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद लोकसभा मतदार संघ एमआयएमला देऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दगा दिल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळेसे पाटील यांनी केला. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली. पाटील औरंगाबाद मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. 

न्या. पाटील फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, वंचित बहूजन आघाडीला दिलेला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारला आहे. मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. सर्व गुणदोषासहित काँग्रेस पक्ष जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखूं शकतो. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला.

त्यांनी मला सुरूवातीपासून काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचे कबूल केले होते. परंतु  आंबेडकरांनी सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे माझ्या हातून कळत नकळत देखील चूक होऊन मोदींना मदत होता कामा नये हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

मी गेली पाच वर्षे सातत्याने मोदी आणि शहा यांच्याविरूध्दच्या ठाम भूमिकेला वंचित आघाडी तडा देत आहे याची खात्री झाल्याने पाठिंबा नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.