Mon, Jul 06, 2020 16:41होमपेज › Aurangabad › खून करून मृतदेह टाकला पाणीपुरवठ्याच्या विहिरीत

खून करून मृतदेह टाकला पाणीपुरवठ्याच्या विहिरीत

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 21 2018 12:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत एका अनोळखी व्यक्‍तीचा नग्‍नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दौलताबाद येथील मोमबत्ता तलावाजवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीजवळ उघडकीस आली. या व्यक्‍तीच्या पोटाला मोठा दगड बांधलेला असल्याने हा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याचे दिसते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी शहरातील काही पर्यटक हे दौलताबादच्या मोमबत्ता तलावाकडे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गेले होते. यापैकी काहींनी बाजूलाच असलेल्या पाणीपुरवठा करणार्‍या सार्वजनिक विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यावर मृतदेह तरंगतांना दिसला. ही माहिती तत्काळ दौलताबाद पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडने, सहायक उपनिरीक्षक तडवी, शेख रफीक, खाजेकर हे घटना स्थळी पोहचले. त्यानंतर अग्‍निशमन दलप्रमुख अब्दुल अजीज, विनायक लिंमकर, शेख समीर, लक्ष्मण कोल्हे, संग्राम मोरे, परमेश्‍वर साळुंखे, शेख तन्वीर, भुरालाल सलामपुरे, वाहनचालक शेख रशीद यांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली.  चार तासांनंतर अखेर मृतदेह बाहेर काढण्यात आला. अज्ञात मारेकर्‍याने खून करून त्याचे पोट चिरून त्यामध्ये दगड भरले. त्यानंतर  मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला. विशेष म्हणजे त्याचे गुप्तांग देखील कापण्यात आले आहे. हा प्रकार आठ ते दहा दिवसांपूूर्वीचा असण्याची शक्यता आहे.