Wed, Jul 08, 2020 17:34होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला वर्षभराची मुदतवाढ

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला वर्षभराची मुदतवाढ

Published On: Mar 02 2019 1:56PM | Last Updated: Mar 02 2019 1:33PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

केंद्रीय पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्याने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. सेंट्रल अँथोरिटी दोन महिन्यांपूर्वीची औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता कायमची रद्द केली होती. प्राणी संग्रहालयातील असुविधा आणि अपुरी जागा यामुळे सेंट्रल झू अँथोरिटीने हे पाऊल उचलले आहे. 

याविरोधात महानगरपालिकेने केंद्रीय पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याकडे आपले अपील दाखल केले. त्यानंतर महापालिकेच्या या अपीलावर केंद्रीय सचिवांकडे नुकतीच सुनावणी पार पडली. त्यात मनपा आयुक्तांनी प्राणिसंग्रहालयात आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम हाती घेतले असून त्या सुधारणा लवकरच होतील, असे नमूद केले. त्यानंतर आता केंद्र शासनाने महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या काळात पालिकेने अपीलात नमूद केलेल्या सर्व बाबींची पूर्तता करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.