Sun, Jul 05, 2020 15:33होमपेज › Aurangabad › हिटलरचा वेश घालून औरंगाबाद मनपाचा निषेध

हिटलरचा वेश घालून औरंगाबाद मनपाचा निषेध

Published On: Aug 14 2018 12:49PM | Last Updated: Aug 14 2018 12:48PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

स्वच्छतेच्या कामासाठी महानगरपालिका नागरिकांकडून आधीच एक कर वसूल करते. आता पुन्हा त्याच कामासाठी पालिकेने नवीन उपभोक्‍ता कर लागू केला आहे. याविरोधात मनसेने मंगळवारी मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले.  यावेळी काही कार्यकर्त्यांनी हिटलरचा वेश परिधान करून मनपाचा निषेध केला. 

महानगरपालिकेने कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम खाजगी कंपनीकडून करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.  पालिका सर्वसाधारण सभेने हा निर्णय लागू करताना साफसफाईच्या कामासाठी नागरिकांवर नवीन उपभोक्‍ता कर लावण्यासही मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला रोज एक रुपया म्हणजे वर्षाकाठी ३६५ रुपये इतका उपभोक्‍ता कर लागणार आहे तर व्यावसायिक मालमत्तांवर वर्षाकाठी तीन हजार ६५० रुपये इतका भार पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा कर आकारण्यास विरोध केला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मनपा समोर आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हा संघटक वैभव मिटकर, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, प्रवीण मोहिते, चेतन पाटील, अ‍ॅड. निनाद खोचे, राजीव जावळीकर, किशोर साळवे आदींचा समावेश होता.