संभाजीनगरचा विषय विधान परिषदेत मांडणार : आमदार अंबादास दानवे

Last Updated: Jan 14 2021 4:48PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

संधी मिळाल्यास सभागृहात संभाजीनगरचा विषय निश्चितच मांडणार आहे. परंतु शहराचे नामांतर ही एक प्रक्रिया असून ती सुरुच आहे. शिवसेनाही त्याचा पाठपुरावा करतच आहे. असे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. (mlc ambadas danve says Sambhajinagars subject will be presented in mlc House) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि.१६) महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. यासाठी गुरुवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संभाजीनगरचा वापर सेनेने राजकीय फायद्यासाठी कधीच केला नाही, संभाजीनगर सेनेची अस्मिता असून त्यासाठी वीस वर्षात ४५ आंदोलने केले आहेत. अनेक शिवसैनिकांवर त्याचे गुन्हे दाखल असल्याचे दानवे यांनी सांगितले. माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, विकास जैन, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.