Fri, Jul 03, 2020 00:41होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पश्चिम बंगालच्या मजुरांनी दिल्या जय महाराष्ट्रच्या घोषणा (व्हिडिओ)

औरंगाबाद : पश्चिम बंगालच्या मजुरांनी दिल्या जय महाराष्ट्रच्या घोषणा (व्हिडिओ)

Last Updated: May 26 2020 11:26AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम बंगालच्या ४३ मजुरांची पुण्याच्या ट्रॅव्हल्स एजंटांनी फसवणूक केली. त्यांना पश्चिम बंगालला सोडण्याचे आमिष दाखवून १ लाख रुपये उकळले आणि औरंगाबादमध्ये आणून सोडले. या फसवणुकीने हतबल झालेल्या आणि रस्त्यावर झोपवे लागलेल्या मजुरांना चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांनी मदत केली.  त्यांनी  त्यांचे पैसे देखील परत मिळवून दिले आणि त्यांना गावी सोडण्याची शासकीय प्रक्रियाही पूर्ण केली.

पश्चिम बंगालमधील आपल्या घरी जात असताना या  दिलासा मिळालेल्या मजुरांनी जय महाराष्ट्र असा जयघोष केला.