औरंगाबाद : प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून मराठा क्रांती मोर्चाने ठिकठिकाणी आंदोलन केले. यावेळी शहरातील सिडको चौकात चूल मांडून अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेवन हिल उड्डाणपूल आणि आकाशवाणी चौक परिसरात शुकशुकाट होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी राज्यभर ५८ मूक मोर्चे काढल्यानंतरही सरकारने आरक्षण न दिल्याने पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले. आता औरंगाबाद न्यायालयातील वकिलांनी न्यायालयापासून मोर्चा काढत बंदमध्ये सहभाग घेतला. शहरातील शहनुरमिया दर्गा चौकासह पैठण लिंक रोडवरही रास्ता रोको करण्यात आला.
औरंगाबादमधील दगडफेकीत राज्य राखीव दलातील पीएसआय एस. के. चिलवंत जखमी