होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

Published On: Jul 31 2018 5:37PM | Last Updated: Jul 31 2018 5:36PMआळंद : प्रतिनिधी

वडोद बाजार (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथे मराठा आरक्षणासाठी  तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रदीप हरिदास म्‍हस्‍के असे या तरुणाचे नाव आहे. दहावीत ७५ टक्‍के मिळाले होते. त्यानंतर त्याने आयटीआयला प्रवेश अर्ज भरला होता, मात्र त्याला प्रवेश मिळाला नसल्याने निराश होऊन विहीरीत उडी टाकून आत्‍महत्या केली.


दहावीनंतर आयटीआयला प्रवेश अर्ज भरला होता, मात्र त्याला तिसरी फेरीतही प्रवेश मिळाला नसल्याने तो निराश झाला होता. वडोदबाजार येथे पुढील शिक्षणासाठी आर्थिक विवंचना असल्याने तो चिंतेत होता.