Sun, Dec 08, 2019 06:51होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पतंग उडवण्यावरून दोन गटात हाणामारी

औरंगाबाद : पतंग उडवण्यावरून दोन गटात हाणामारी

Last Updated: Oct 10 2019 10:51AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

येथील जिन्सी परिसरात बुधवारी संध्याकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी  झाली. केवळ पतंग उडवण्यावरून दोन कुटुंबामध्ये वाद होऊन तो हाणामारीपर्यत पोहोचला.  

जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबात पतंग उडवण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. यात जवळपास सहा ते सात जखमी झाले आहेत. या हाणामारीत अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रात्री उशिरापर्यत जिन्सी पोलिसांनी सर्व जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. दरम्यान घटनेला निवडणुकीचा फायदा घेत राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.