अंधारी : प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वामन शंकर सोनवणे यांच्या उत्तरकार्य दिनी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील भवानी माता मंदिराजवळील चौकाचे ‘स्वातंत्र्यसैनिक वामन शंकर सोनवणे’ हे नाव देवून आनावरण करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांच्या हस्ते या चौकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक सुनीलकुमार पाटणी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण पाटील तायडे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटणी, विलास घडमोडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आबाराव पाटील, तायडे खरेदी विक्री संघाचे संचालक अब्दुलरहीम शेख, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अण्णाभाऊ पांडव, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, तायडे उपसरपंच भानुदास तायडे, विठ्ठल तायडे, माधराव पाटील, तायडे शेख, फकिरा सय्यद, सिद्दीक ज्ञानेश्वर पांडव, अनिल गोरे, शेख कैसर विठ्ठल आप्पा सोनवने आदी उपस्थित होते.