Thu, Jun 24, 2021 10:58
औरंगाबाद : हतनूर शिवारातील विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू

Last Updated: Jun 08 2021 8:28PM

हतनूर : पुढारी वृत्तसेवा ; कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील विलास काळे यांच्या विहिरीत कोल्हा पडल्याने बुडून मृत्यु झाला. शेतातील विहीर ही जमिनीला समांतर आहे. दरम्यान कोल्हा पाण्याचा शोधात गेला असल्याने विहिरीत उडी घेतली असल्याचा अंदाज वर्तविन्यात येत आहे.

अधिक वाचा : 'जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच'

ही घटना (दि.०८) रोजी मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास घडली. या विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे कोल्ह्याला बाहेर पडता आले नसल्याने त्याचा पाण्यात मृत्यू झाला. विहिरीत आवाज येत असल्यामुळे शेजारील शेतकऱ्यानी विहिरीजवळ जाऊन बघितले असता ही घटना उघडकीस आली. 

अधिक वाचा : लस घ्या आणि एफडीवर अधिक व्याज मिळवा, या बँकांनी मर्यादित कालावधीची दिली ऑफर

गावकऱ्यांनी ही माहिती वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान कोल्हाचा पाण्यातच मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.