Sat, Sep 19, 2020 11:34होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : श्वानाला दगड मारल्याने मुलावर चाकूहल्ला

औरंगाबाद : श्वानाला दगड मारल्याने मुलावर चाकूहल्ला

Last Updated: Sep 15 2020 7:51AM

संग्रहीत छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

श्वानाला दगड का मारला म्हणून भाजी विक्रेत्यांनी अल्पवयीन मुलावर चाकूहल्ला केला. जबिंदा इस्टेट बिल्डिंगसमोर सोमवारी (दि.१४) दुपारी  ही घटना घडली. 

जगजीतसिंग जसपालसिंग संधू (वय १२) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो घरासमोर असताना काही अल्पवयीन मुले भाजी विक्री करीत त्या भागात आली. त्यांच्यासोबत श्वान होता. जगजीतसिंगने त्या श्वानाला दगड मारला. त्यावर भाजी विक्रेत्या मुलांनी दगड का मारला असा जाब विचारून वाद घातला. 

हे प्रकरण वाढत गेले आणि भाजी विक्रेत्या मुलांनी भाजी कापण्याचा चाकू काढून जगजीतसिंगच्या मांडीत खुपसला. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. जखमी मुलगा जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने गुन्हा नोंद झाला नाही, अशी माहिती उस्मानपुरा पोलिसांनी दिली.

 "