Sun, Jul 05, 2020 15:57होमपेज › Aurangabad › सोन्यासारखे चकाकणारे कासव तुम्ही पाहिले का?

सोन्यासारखे चकाकणारे कासव तुम्ही पाहिले का?

Published On: Dec 17 2017 10:00AM | Last Updated: Dec 17 2017 10:00AM

बुकमार्क करा

वरठाण : प्रतिनिधी

जगाच्या पाठीवर विविध प्रकारचे लहान, मोठे कासव आढळतात, परंतु पळाशी (ता. सोयगाव) येथील नदी किनारी असलेल्या घराच्या अंगणात सोन्यासारखा चमकणारा एक से. मी. आकाराचा दुर्मीळ कासव आढळून आल्याने त्याला बघण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत आहेत.

जगाच्या पाठीवर मोठ्यात मोठ्या आकाराच्या कासवासंबंधी चर्चा नेहमी होत राहते. परंतु एका सें. मी. आकाराचेही दुर्मिळ कासव पळाशी येथे आढळून आले. पळाशी येथील ऑटोमोबाइल चालक कृष्णा पाटील शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यावर अंगणात आल्यावर त्यांना अंगणात सोन्यासारखा पिवळ्या रंगाचा चकाकणारा छोटासा कासव चालताना दिसला. त्यांना थोडावेळ विश्वास बसला की हे कासव आहे. मग त्यानी बारीक न्याहळत कासवाला स्पर्श केला असता कासवाने जागेवरच पाय, तोंड शरीराच्या आत घेत पडून राहिले काही वेळानंतर ते चालू लागल्याने कृष्णा पाटील कासव असल्याची खात्री पटल्यावर किन्ही येथील निसर्ग मित्र सुभाष जोशी यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिल्यावर ते पळाशी येथील कापुरी नदी किनारी असलेल्या कृष्णा पाटील यांच्या घरी जाऊन कासवाचे बारकाईने निंरीक्षण केले असता अशा प्रकारचा कोणताही किडाही नसल्याने ते दुर्मीळ कासवच असल्याचे सांगितले.

कासवाचे अंडे ही कोंबडीच्या अंड्याच्या आकारा सारखेच असल्याने त्या अंड्यातून निघणारे पिलू हे कमीत कमी चार ते पाच सेंटिमीटर आकाराचे असल्याने तीन सेंटिमीटर पेक्षा लहान कासव सहजासहजी आढळत नसल्याने पळाशी येथे आढळून आलेले कासव हे एक से. मी. आकाराचा असून त्याचा पाठीचा रंग इतर कासवा प्रमाणे तपकिरी काळपट आहे, पंरतु शरीराचा जमिनीला चिपकणारा भाग पूर्ण पणे सोन्यासारखा असून शरीराला सोन्यासारखी चमक सुद्धा आहे त्याला इतर कासवाप्रमाणे चार पाय असून पाठ सुद्धा टणक आहे. त्याला स्पर्श केल्यावर कासवाप्रमाणे शरीर, पाय आकुंचन करून जागेवरच पडून राहते शरीराची काहीही हालचाल करीत नाही त्याला काही वेळानंतर सुरक्षित वाटल्यानंतर चालायला लागते. शरीर सोन्यासारखे असून एक सेंटिमीटर आकाराचा असल्याने एखाद्या देव्हा?र्‍यातील पुजेसाठी ठेवलेल्या कासवाप्रमाणे असल्याने परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पळाशी गाठून कुतुहूलाने पहात असून पाहिल्यानंतर सर्वाच्या तोंडून एकच शब्द असून मी असा कासव कोठेही पाहिला नसून ते जगा वेगळा असल्याचे बोलताना सांगतात.