Sun, Jul 12, 2020 17:44होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन 

औरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन 

Published On: May 05 2018 12:56PM | Last Updated: May 05 2018 12:56PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद शहरात पाण्याची ओरड सुरूच आहे.  पाण्यसाठी सलग दुसऱ्या दिवशी महिलांनी सिडको एन-5 येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले.  त्यांनी पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी आलेले टँकर सुमारे दोन तास रोखले.

सिडको एन- सहा मथुरानगर येथे  सहसा सकाळी सहा वाजता पाणी येते. मात्र आठ वाजले तरीही पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले.  संतप्त झालेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. या ठिकाणी नेहमीप्रमाणे टँकर भरण्यात येत होते. हे टँकर नागरिकांनी पाण्याच्या टाकीचे गेट  रोखून धरले. हे आंदोलन सुमारे दोन तास  सुरू होते. दरम्यान दुपारी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. 

शुक्रवारी गुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांनीही  पाण्यासाठी  पाण्याच्या टाकीजवळ येत आंदोलन केले होते.

 

Tags : aurangabad, aurangabad news, water shortage in aurangabad city, protest for water,