Sat, Jul 04, 2020 02:34होमपेज › Aurangabad › चिकलठाण्यात अग्नितांडव

चिकलठाण्यात अग्नितांडव

Published On: May 15 2019 1:50AM | Last Updated: May 15 2019 12:56AM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

चिकलठाणा बाजारतळाजवळील गॅरेजच्या रांगेला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. त्यातील 15 गॅरेजपैकी आठ आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सुमारे 50 चारचाकी गाड्यांना आगीची झळ पोहोचली, तर 20 गाड्या पूर्णपणे खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे हे अग्नितांडव घडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हिनानगरसमोर चारचाकी गाड्यांचे अनेक गॅरेज आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये एका रांगेत ही दुकाने आहेत. सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने सहारा मोटर्सला आग लागली. त्यानंतर न्यू मिरॅकल, ओल्ड मिरॅकल या गॅरेजला आग लागली. काही क्षणात सारा मोटर्स, गुडलक शॉकअप, मनोज मोटर्स, समीर अर्थमोअर गॅरेज आदी 8 गॅरेज आगीने वेढले गेले. यात गॅरेजमधील 50 चारचाकी गाड्यांना झळ बसली. यापैकी बहुतांश गाड्या दुरुस्तीसाठी येथे     चिकलठाण्यात अग्नितांडव लावण्यात आल्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. परंतु,आग मोठी असल्याने तिसरा बंबही मागविण्यात आला. पाणी कमी पडल्यामुळे टँकर आणण्यात आले. नगरसेवक मनोज गांगवे, ज्ञानेश्वर डांगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. 

गॅसमुळे स्फोट : चारचाकी गाड्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गॅस ठेवलेला असतो. गॅस वेल्डिंगची कामे केली जातात. आग लागल्यानंतर या गॅसचा स्फोट झाल्यामुळे आग भडकली. आगीचा मोठा डका उडाला. मिरॅकल कोटिंग अँड गॅरेज व एसके गॅरेज अशी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या काही दुकानांची नावे आहेत.