Thu, Jul 09, 2020 22:50होमपेज › Aurangabad › माजी खासदार प्रदीप जैस्वालांच्या विरोधात गुन्हा दाखल 

माजी खासदार प्रदीप जैस्वालांच्या विरोधात गुन्हा दाखल 

Published On: May 21 2018 2:51PM | Last Updated: May 21 2018 2:51PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तोडफोड करून गोंधळ घातल्‍या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय शेख अकमल यांच्याकडे ताब्‍यात असलेल्या आरोपीला का सोडत नाही? अशी मागणी करून त्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी कॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे यांच्या फिर्यादीवरून प्रदीप जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

शिवसेनेला पोलिस का त्रास देतात? असा जाब विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ केली. त्‍याबरोबरच सरकारी मालमत्तेचे नुकसानही केल्‍याचा आरोप जैस्‍वाल यांच्यावर करण्यात आला आहे.  
पोलिस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Tags : pradeep jaiswal, urangabad, shivsena