Sat, Sep 19, 2020 10:49होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणासाठी आमदार राजपूत यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन 

मराठा आरक्षणासाठी आमदार राजपूत यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन 

Last Updated: Sep 14 2020 12:29PM
कन्नड  (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील नागद येथे मराठा समाजातर्फे आमदार उदयसिंग राजपुत यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. मराठा मोर्चाने ठरविल्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करायचे ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या निवासस्थानी मौजे नागद येथे दिनांक १४ सोमवार रोजी "ढोल बजाव" आंदोलन सकाळी नऊ वाजता शांततेच्या मार्गाने कायद्याचे पालन करून करण्यात आले. आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक नागद येथून सुरुवात होऊन आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवून संमाप्त झाले. 

यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव आंदोलनाला सहभागी झाले होते. आंदोलनाला येताना प्रत्येकाकडून सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भगवान ठाकरे, काकासाहेब तायडे, प्रदीप बोडखे, दिनेश मोरे, समाधान पाटील, विजय सुर्यवंशी, संतोष पाटील, रमेश पाटील, छोटू पाटील, धीरज पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, राहुल पाटील, वामन पाटील, दिपक शेळके, हरिष पाटील, रितेश मोरे तसेच महिला, संगीता ठाकरे, मनीषा ठाकरे, मालू पाटील, जिजाबाई ठाकरे, निर्मला पाटील, समाज बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

 "