Sat, Jul 11, 2020 18:53होमपेज › Aurangabad › बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी 

बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी 

Published On: Jul 21 2019 8:09PM | Last Updated: Jul 21 2019 8:45PM
 वरठाण (जि. औरंगाबाद) : प्रतिनीधी 

सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात शेतात काम करणाऱ्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. भारत हरिचंद चव्हाण(वय, ३०) आणि मनीषा भारत चव्हाण(वय, २३, रा.वरसाडा ता.पाचोरा) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत.

कवली (ता. सोयगाव) शिवारात भारत आणि मनीषा शेतात खुरपणीचे काम करत असताना शेतीच्या बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मनीषा यांच्यावर हल्ला केला. भारत यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पत्नीला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. 

भारत यांनी पत्नीला वाचविण्यासाठी बिबट्याशी दोन हात केले. परंतु बिबट्याने त्यांच्यावरही जोरदार हल्ला केला. बिबट्या आणि भारत यांच्यता जवळपास अर्धा तार झटापट झाली. यावेळी पत्नी मनीषा यांनी जोरदार आरडा ओरडा केला. मनिषा यांचे ओरडने ऐकून शेजारच्या शेताक काम करत असलेले अजमोद्दिन तडवी, मनोज पाटील आणि विष्णू पाटील घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत बिबट्याने भारत यांचा निम्मा हात तोंडात घेतला होता. समोरची परिस्थिती पाहून अजमोद्दिन, मनोज आणि विष्णू यांनी  शिताफीने भारतला बिबट्याच्या तावडीतून सोडविले आणि बिबट्याला हुसकावून लावले. 

बिबट्याच्या हल्ल्यात भारत आणि पत्नी मनीषा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत भारतच्या शरीरावर आणि पायाच्या व हाताच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

दरम्यान, या हल्ल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखर करण्यात आले आहे. परंतु, या घटनेमुळे परिसरातील नारिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.