Tue, Dec 10, 2019 09:52होमपेज › Aurangabad › वाळूज येथे कार अपघातात २ जण ठार

वाळूज येथे कार अपघातात २ जण ठार

Published On: May 24 2018 11:55AM | Last Updated: May 24 2018 11:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील धावणी मोहल्ला येथील दोघांचा कार अपघातात  मृत्‍यू झाला तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा रामभाऊ बुटे (वय, ३८) आणि मनोज भालचंद्र शेडुते (रा.जालना) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत. तर, शिवाजी कुलथे (रा. वैजापूर.) आणि सुभाष मुंडलिक (रा.ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर घाटीतील रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

 वाळूजकडून औरंगाबादकडे येणाऱ्या कारचा बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.