होमपेज › Aurangabad › पिशोरमध्ये बहिणीवर सख्या भावाकडून लैगिक अत्‍याचार   

पिशोरमध्ये बहिणीवर सख्या भावाकडून लैगिक अत्‍याचार   

Published On: Aug 07 2019 9:26PM | Last Updated: Aug 07 2019 8:54PM
पिशोर (औरंगाबाद) : प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने अत्‍याचार केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. या प्रकारावर आईनेही स्‍वता : च्या मुलीला साथ न देता या प्राकारावर पाघरून घालण्याचा प्रयत्‍न केला. रक्षा बंधनाच्या आधीच बहिण भावाच्या पवित्र नात्‍याला काळीमा फासणारी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडल्‍याचे समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिशोर येथील सोनगीर परिसरात राहणार्‍या (१८ वर्षीय) तरुण आलिम याने त्याच्या लहान बहिणीला घरात एकटी पाहून तिच्यावर अत्‍याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी  पीडित मुलीने या घृणास्‍पद प्रकाराला विरोध केला. मात्र स्‍वता: च्या बहिणीची दया न आल्‍याने भावाने तीच्यावर अतिप्रसंग केला. 

माणुसकीच्या नात्‍यांना काळीमा फासणारी ही घटना दि ५ ऑगस्‍ट रोजी घडली. या प्रकारानंतर त्रास होउ लागल्‍याने या प्रकाराची माहिती मुलीने आईला सांगितली. मात्र आईने  तिला तुझी आणि घराची बदनामी होईल त्यामुळे तुझ्या सोबत घडलेला प्रकार बाहेर कोनास सांगू नकोस म्‍हणत तीला शांत केले.

दुसऱ्या दिवशी मुलीची आई ही दळन दळण्यासाठी गेली असता, अलीम याने तिच्या बहिणीला एकटी पाहून तीच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी मुलीने विरोध केला असता, तुला गळा दाबून ठार मारेन अधी मोठ्‍या भावाने धमकी देत बहीणीवर पुन्हा अत्‍याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्‍या मुलीने  त्रास होऊ लागल्याने घडलेला प्रकार पुन्हा आईला सांगितला, पण आईने तिची मदत करण्या ऐवजी मुलीला तुला कालच सांगितले होते कोनास काही सांगू नकोस म्‍हणत तीला दरडावले. 

मात्र जास्‍त त्रास होउ लागल्‍याने मुलीने आईला विनंती केली, पण समाजातील अब्रुच्या भीतीने आईने  तिला काठीने मारहाण केली. त्यामुळे पीडित मुलगी जोरजोरात रडू लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या महिलांनी तिला दवाखान्यात दाखल केला असता, त्यातील एक जागरूक महिलेने हा सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत, सपोनि जगदीश पवार यांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अलीम शेख व त्याची आई यांच्या विरोधात बालकांचे (काळजी व संरक्षण अधिनियम) 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, अलीम यास दोन दिवसांची पोलिस कोठडी व मुलाच्या आईस न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेने पिशोर परिसरात बहीण भावाच्या या अतूट नात्याला रक्षाबंधना पूर्वीच ग्रहण लागले आहे. या घटनेचा पुढील तपास स पो नि जगदीश पवार करीत आहेत.