Fri, Oct 30, 2020 18:09होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : धारकुंड धबधब्यात बुडालेलेल्या तीन तरुणांचे मृतदेह मिळाले 

औरंगाबाद : धारकुंड धबधब्यात बुडालेलेल्या तीन तरुणांचे मृतदेह मिळाले 

Last Updated: Aug 21 2020 1:04AM
वरठाण : पुढारी वृत्तसेवा

मित्रांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी फिरायला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन तरुण रविवारी दि.९ रोजी धारकुंड (बनोटी) तलावात बुडाल्याची घटना समोर आली होती. या तीनही तरुणांचा मृतदेह चोविस तासांच्या अथक परिश्रमातून शोध मोहीमेस यश आले.

वाचा :  औरंगाबाद : ७४ रुग्णांची वाढ, ५ जणांचा मृत्यू

राहुल रमेश चौधरी (वय २२, रा.हनुमान नगर, अयोध्या नगर) व राकेश रमेश भालेराव (रा.सुप्रिम कॉलनी जळगाव) गणेश सोनवणे (राधानगरी, जारगाव जळगाव) हे तीन तरुण बनोटी जवळील धारेश्वर येथील उंचावरून पडणारा धबधबा तसेच नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दुचाकीने येथे गेले होते.

या तीन तरुणांबरोबर ६ तरुण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. तर तीनजण धबधब्याखालील तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने व दम भरल्याने तिघे पाण्यात गेले तसे वरती आलेच नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्यांचा शोध घेतला. गावात माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. पाण्याची पातळी खोल, रात्रीची वेळ आणि पाऊसामुळे शोध मोहीम थांबवून सर्वजणांनी बनोटी पोलिस दूरक्षेत्र गाठत घटनाक्रम सांगितला. त्यानंतर बनोटी दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार सुभाष पवार, सतीश पाटील दिपक पवार, विकास दुबीले यांनी जबाब नोंद घेऊन. पोलिसांनी सकाळी शोध मोहीमेसाठी सुरुवात केली.

औरंगाबाद ते बनोटीचे अंतर १२० किलोमीटर असल्याने अग्निशमन दलाची वाट न पाहता स्थानिक मच्छीमार तसेच पोहण्यात तरबेज असणारे रामदास जाधव, आत्माराम सोनवणे, उपसरपंच सागर खैरनार तसेच ग्रामस्थांना बरोबर घेत शोध मोहीम चालविली यात दुपारी चार वाजेपर्यत दोघांचे मृतदेह हाती लागले. मात्र तिसऱ्या युवकाचा थांगपत्ता लागत नव्हता दुपारी तीन वाजता औरंगाबाद येथून आलेल्या अग्निशमन दलाने मोर्चा सांभाळत दोन तासांच्या प्रयत्नातून यश मिळाले आणि मृतदेह हाती आल्यावर तिंघाचे मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात आणत त्यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण कदम यांनी शवविच्छेदन केले.  

सोयगाव महसूल प्रशासनाकडून घटनेस नैसर्गिक आपत्ती घोषीत करीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात नोंद घेण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास घटनेचा अहवाल पाठविण्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील सर्व नैसर्गिक पर्यटनस्थळे प्रतिबंधित घोषित करीत आठवडाभरासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला असून प्रशासन लक्ष ठेवणार आहे.

वाचा : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची बदली

 "