होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : ठाकरेनगरातील कुंटणखाना उद्ध्वस्त

औरंगाबाद : ठाकरेनगरातील कुंटणखाना उद्ध्वस्त

Published On: Dec 09 2017 1:49AM | Last Updated: Dec 09 2017 1:46AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील दोन ‘स्पा’ सेंटरवर छापा मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याची घटना ताजी असतानाच गुन्हे शाखा पोलिसांनी ठाकरेनगरातील उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखाना उद्ध्वस्त केला. गुरुवारी रात्री शहरात खळबळ उडवून देणारी कावाई झाल्यानंतरही ठाकरेनगरात कुंटणखाना चालू होता, हे पोलिसांना आव्हानच म्हणावे लागेल. 

चार हजार रुपयांत देहविक्री करणार्‍या तीन महिला आणि एका आंटीला पोलिसांनी पकडले. तसेच, आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुनीता गंगाधर कारभारे (44, रा. घर क्र. ए.एच 2/21, एन-2, ठाकरेनगर) असे दलाल महिलेचे नाव असून ती तिच्याच घरात देहविक्रीसाठी महिला, ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेनगरमध्ये उच्चभ्रू वसाहतीत वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार संतोष सोनवणे, नाईक सुधाकर राठोड, कॉन्स्टेबल शेख नवाब, नंदलाल चव्हाण, वीरेश बने, सिद्धार्थ थोरात, लालखा पठाण, योगेश गुप्ता, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, हिरसिंग राजपूत यांच्यासह मुकुंदवाडी पोलिसांनी छाप्याची तयारी केली. 

ठाकरेनगरमध्ये दोन पंटर पाठविले. त्यांनी आंटी सुनीता कारभारे हिच्याशी बोलणी केली. तिने चार हजार रुपयांची मागणी करून तरुणी उपलब्ध करून दिली. पंटरने खात्री पटल्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. त्यानंतर लगेचच छापा मारून चार मोबाइल, चार हजार रुपये रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.