Mon, Jun 01, 2020 21:03
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › लाचप्रकरणी प्रांताधिकारीसह दोघे एसीबीच्‍या जाळ्‍यात

लाचप्रकरणी प्रांताधिकारीसह दोघे एसीबीच्‍या जाळ्‍यात

Published On: Dec 28 2017 5:19PM | Last Updated: Dec 28 2017 5:19PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

अपिलावर लवकर सुनावणी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील उपविभागीय अधिकारी (एसडीएम-प्रांताधिकारी) आणि त्यांचा स्टेनो या दोघांना पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिल्लोड येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.

उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड आणि स्टेनो साखरे अशी पकडलेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या पथकाने हा छापा मारला. बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांच्यानंतर हे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्‍यात सापडले आहेत.