होमपेज › Aurangabad › छेडणार्‍यांना ‘कराटेक्वीन’चा चोप ( व्हिडिओ )

छेडणार्‍यांना ‘कराटेक्वीन’चा चोप ( व्हिडिओ )

Published On: Dec 16 2017 9:06AM | Last Updated: Dec 16 2017 9:48AM

बुकमार्क करा

वाळूज : प्रतिनिधी

पुणे, मुंबईसह नाशिकमध्ये तरुणींच्या छेडछाडीच्या घटना समोर आलेल्या असतानाच वाळूज भागातही रिक्षातून जाणार्‍या तरुणांनी चार मुलींची छेड काढली. त्यानंतर मुलींनी ती रिक्षा अडवूनत्या तरुणांना बेदम चोप दिला. तसेच,तरुणांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु, अल्पवयीन तरुणांनी तत्काळ माफी मागितल्याने केवळ तक्रारीवरच हे प्रकरण मिटले. वाळूज भागात बुधवारी हा प्रकार घडला. शुक्रवारी याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

कराटेचे प्रशिक्षण घेणार्‍या 13 ते 14वर्षे वयाच्या चार मुली रस्त्याने जात होत्या. त्याच भागात राहणारे 14 ते 15 वर्षे वयाचेतीन, चार विद्यार्थी रिक्षातून प्रवास करीत होते. ते रिक्षात मोठ्याने गाणे म्हणत होते.तसेच, शिट्ट्या वाजवून त्यांनी छेड काढली. त्यामुळे संतापलेल्या मुलींनी ती रिक्षाअडवून तरुणांना रस्त्यावरच चोप दिला.तरुणांना अद्दल घडविल्यानंतर मुलींनी त्यांना थेट पोलिस ठाण्यात नेले. तेथेही त्यांना चोप दिला. दरम्यान, हा प्रकार तरुणी आणि तरुणांच्या पालकांना समजल्यावर ते ठाण्यात धावले. ते एकाच भागातील रहिवासी असल्याने मुलांच्या माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले. परंतु, तोपर्यंत तरुणींनी मुलांना चोप दिला होता. 

पोलिस ठाणे परिसरात घेतात प्रशिक्षण

ज्या तरुणींनी मुलांना चोप दिला, त्या वाळूज ठाणे परिसरातच कराटेचे प्रशिक्षण घेतात. त्यामुळे त्यांचा पोलिसांशी नियमित संपर्क येतो. त्यामुळे मुलांनी छेड काढल्याच्या संशयावरून त्यांनी रिक्षा अडवून त्यांची धुलाई केली, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नसून तरुणांना समज देऊन सोडण्यात आले आहे.