Tue, Jan 19, 2021 16:33होमपेज › Aurangabad › राजकारणातून निवृत्ती घेतोय; संजना जाधव विधानसभा लढवणार : हर्षवर्धन जाधव

राजकारणातून निवृत्ती घेतोय; संजना जाधव विधानसभा लढवणार : हर्षवर्धन जाधव

Last Updated: May 23 2020 2:51PM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा 

कोईम्बतूर येथील जग्गी वासुदेव या महाराजांचे शिष्यत्व मी स्वीकारले आहे. सक्रीय राजकारणातून निवृत्त होऊन मी अध्यात्माकडे जाणार असून संजना जाधव या कन्नड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली

कोरोना लॉकडाऊनमध्ये काळात मी आत्मपरीक्षण केले असता राजकारणात राहून सुख मिळणार नसल्याचे दिसून आले. त्यासाठी राजकारण त्यागून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या पत्नी संजना जाधव या आगामी विधानसभा निवडणूक लढवतील. त्यांच्या प्रचारासाठी मी कन्नडला येईल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले,

जाधव यांच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करून सुमारे तीन लाख मते त्यांनी घेतली होती. त्यामुळे शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. संजना जाधव या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या असून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.