Tue, Jul 07, 2020 19:22होमपेज › Aurangabad › अर्भक मृत्यू प्रकरण : डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

अर्भक मृत्यू प्रकरण : डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

Published On: Feb 01 2019 2:08PM | Last Updated: Feb 01 2019 2:08PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

अर्भक मृत्यू प्रकरणात 21 जानेवारीच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर, नर्स, चतुर्थ कर्मचारी यांची डायरेक्‍टर ऑफ मेडिकल ॲण्ड  एज्‍युकेशन बोर्ड (डीएमईआर) च्या चौकशी समितीच्या वतीने चौकशी सुरू आहे. राज्य उपसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. अधिष्ठाता दालनात 12 वाजता चौकशीला सुरुवात झाली असून, 10 कर्मचाऱ्यांचा यामध्ये  समावेश आहे. 

21 डिसेंबर च्या मध्यरात्री घाटीत एका महिलेची वाटेतच प्रसूती झाली होती. त्यात अर्भकचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यस्तरावर याची दखल घेण्यात आली आहे. यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. 

विशेष बाब म्हणजे स्थानिक चौकशी समितीने 10 कर्मचाऱ्यांना निर्दोशी ठरविले आहे, तर तत्काळ उपाययोजनाला प्राधान्य दिले आहे. यामुळे राज्याच्या चौकशी समितीमुळे घाटी कर्मचाऱ्यांनी मात्र धास्ती घेतली आहे. या समितीत वरिष्ठ स्तरावरील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. या समितीकडून  सर्वप्रथम घटना स्थळाची पाहणी करण्यात आली आहे.