होमपेज › Aurangabad › ‘माझा आजचा शेवटचा दिवस’ असे ‘स्टेट्स’ ठेवून तरुणाचा गळफास

‘माझा आजचा शेवटचा दिवस’ असे ‘स्टेट्स’ ठेवून तरुणाचा गळफास

Last Updated: Jan 18 2020 1:29AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

‘माझा आजचा शेवटचा दिवस’ असे ‘स्टेट्स’ ठेवून 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. सोमवारी सकाळी दहा वाजता बीड बायपासवरील जिजामाता नगरात ही घटना उघडकीस आली. 

अविनाश अनिल उघडे (18, रा. जिजामाता नगर, बीड बायपास) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एन-3 मधील छत्रपती कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशचे आई-वडील मजुरी करतात. त्याला एक लहान भाऊ आहे. तो नववीच्या वर्गात शिकतो. रविवारी अविनाश रात्री उशिरापर्यंत बाहेर होता. सोमवारी सकाळी तो उशिरा उठेल, असे समजून वडील कामावर गेले तर आई बाहेर गेली होती. दरम्यान, सकाळी दहा वाजता त्याच्या लहान  भावाला अविनाश झोपलेल्या खोलीतून आवाज आला. तेव्हा त्याने जाऊन पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजार्‍यांनी तत्काळ त्याला फासावरून उतरविले आणि तत्काळ हेडगेवार रुग्णालयात भरती केले. मात्र, रुग्णालयातून त्याला घाटीत हलविण्याचा सल्‍ला दिला. घाटीत तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक लक्ष्मण राठोड करीत आहेत.