Sun, Jul 05, 2020 03:31होमपेज › Aurangabad › अंधारी प्रशालेत जागतिक योग दिन साजरा

अंधारी प्रशालेत जागतिक योग दिन साजरा

Published On: Jun 21 2019 1:30PM | Last Updated: Jun 21 2019 1:30PM
अंधारी : प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषद प्रशालेत पाचवा आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी , आजारांवर मात करण्यासाठी तसेच मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी 'योग' महत्त्वाची भूमिका साकारतो. त्याचमुळे भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

जि. प. केंद्रीय शाळा व  प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांनी विविध योगासने करीत आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सिल्लोड पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर तायडे, सरपंच विजय गोरे, उपसरपंच चंद्रकलाबाई भानुदास तायडे, ग्राम पंचायत सदस्य डॉ. मनोहर गोरे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष धृपद तायडे व रईस पठाण, अंकुश तायडे, विठ्ठल तायडे, राजू ढवळे, ज्ञानेश्वर तायडे, मुख्याध्यापक एकनाथ जाधव व केंद्रीय मुख्याध्यापक अशोक गोंडाळे, संभाजी चव्हाण, सुरेश अक्कर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी रंगनाथ काथार, अनिल मेश्राम, संजय गोठवाल, विजय आढाव, विजय चोपडे, अनिल सुरसे, गायकवाड प्रशांत, प्रवीण बुरुड, आजीनाथ ढेपले,दशरथ वाट, सांडू काटकर, मिना धस, मंदाकिनी दिडवाले, संगीता बाबरेकर, प्रज्ञा भालेराव,छाया भुतेकर, चंद्रकला सुरकूतलावार आदींनी परिश्रम घेतले.