होमपेज › Aurangabad › भेंडाळा येथे मजुराची आत्महत्या

भेंडाळा येथे मजुराची आत्महत्या

Published On: Feb 04 2019 1:57AM | Last Updated: Feb 03 2019 7:10PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे एका मजुराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

उमेश लक्ष्मण नरोडे (वय ४८)  असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे. दारूच्या नशेत स्वतःच्या भेंडाळा येथील उमेश याने राहत्या घरात शनिवारी  मध्यरात्री नंतर दारू पिऊन लोखंडी अँगलला केबल वायर गुडांळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली. पुढील तपास पोलिस जमादार गणेश काथार, पोलिस हवालदार पाडळे करत आहे.