सिल्लोड : प्रतिनिधी
३० जूनपर्यंत चारा छावण्या सुरु ठेवण्याचे नियोजन असुन यदाकदाचित पाऊस लांबल्यास गुरांसाठी चारा निर्माण होईपर्यंत चारा छावण्या चालूच ठेवणार असल्याची माहिती माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी पशुपालकांना देऊन दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी एकप्रकारे दिलासाच दिला आहे.
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतुने माजीमंञी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने नॅशनल एज्युकेशन सोसायटी, आदर्श एज्युकेशन सोसायटी व हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटी यांसह इतर संस्थेमार्फत सिल्लोड तालुक्यात जनावरांसाठी शासनमान्य चारा छावणी उभारण्यात येत असून शुक्रवार ( दि.०७ ) रोजी नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे शिवाई मंदिराजवळ चारा छावणीचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, मुरलीधरराव काळे, शेख सलिम, निजाम पठाण, राजुमिया देशमुख, प्रकाश जाधव, हाजी शेख सलिम, शेख वहाब (बाबुमिया), इस्माईल कुरैशी, शामराव होळकर, नारायण पायघण, एकनाथ राऊत, विठ्ठल पाटील, नाना जगताप, सखाराम धनवई, शेख शफिक आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चारा छावण्या उभारणार - आ. अब्दुल सत्तार
शिवना येथे गुरांसाठी चारा छावणी उभारण्यात आली. यावेळी शिवना येथील मेंढपाळांनासाठीही चारा छावण्या सुरू करण्यांसंदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुळकर्णी यांना फोनवर मेंढपाळांच्या दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करण्यासंदर्भात चर्चा केली असता मेंढपाळांसाठीही चारा छावण्या सुरू करण्यांसंदर्भात दुजोरा देत मेंढपाळांसाठीही चारा छावण्या उभारण्यात येणार असल्याची माहिती माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवना येथील मेंढपाळांना देऊन दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मेंढपाळांनाही एकप्रकारे दिलासा दिला आहे.